Sunday, 10 January 2016

" एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्मला " वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जीवनात कलेला खुप जास्त महत्व दिले आहे. माणूस जन्माला आला तेव्हापासुन कलेने जीवन जगावे हेच त्यांचे स्वप्न होते. अरे पशु पक्षा जवळ कला असते मग माणसाजवळ का नको. कला असे मानवाचे भूषण । परी पाहिजे जीवनाचे त्या स्मरण । जगावे सुखसमाधान । धरोनिया अंतरि ।। अ.१३/१९ ।। ऐसी असावी सर्व कला । नाहितरि वाया गेला । प्राणी जन्मला आणि मेला । नाहकचि ।। अ.१३/२० ।। कला हेच मानवाचे भूषण आहे. परंतु त्या कलेतही जीवनाचे स्मरण आवश्यक आहे. अशी मनाची पक्की धारणा करून मानवाने सुख आणि समाधानाने जगावे. म्हणुन अशा सर्व कलांचा आविष्कार मानवात असावा नाहीतर त्याचा जन्म वाया गेला, व्यर्थ गेला असे समजावे. मानव प्राणी जन्मला आणि नाहक मेला असे कधी होऊ नये. कला आहे म्हणूनच त्याला कोणीही ओळखतो नाहीतर त्याला कोणी पुसले नसते. कुणी श्रीमंत असो वा कुणी गरीब पण त्यांनी सुद्धा कलावान बनावे. यातचि सर्व मानवांचे शहाणपण सामवाले आहे. अहो ! जीवनाची एकतरी कला । असावी लागते मानवाला । तरिच तो ' मानव ' शोभला । नाहितरि कल्ला जीवनाचा ।। अ.१३/२८ ।। म्हणून जीवन जगण्याची एक तरी कला मानवात असावी लागते. त्यानेच तो खऱ्या अर्थाने मानव म्हणून शोभुन दिसतो. नाहीतर त्याच्या जीवनाचा कल्ला झालाच म्हणून समजा जगने मरणे सगळे जाणे, याने संपत नाही गाने पर उपकाराविन का जीन तुकड्यादास म्हणे सगळ्याला नाहितरि काय फुका जन्मला. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो मानुस असो बाई असो मुलगा असो मुलगी असो कलेने जीवन जगा त्यातच खरा जगण्याचा आनंद आहे हो... परंतु मित्रहो, अवकळा नसल्यास कला माणसाला श्रेष्ठ बनवते. आणि तीच कला अंगी मुरल्यास त्याने मानवाला पूर्णत्व लाभ . अवकलेने अधःपतन होत असून कलेने देवत्व प्राप्त होते म्हणून माणसाजवळ कला असावी पण अवकळा तिथे नसावी. कला मानवासी देव बनविते । परी अवकळा नसावी जरा तेथे । पूर्णताहि कलेनेच येते । रमता अंगी आत्मबोध ।। अ.३६/४० ।।